Ad will apear here
Next
आयुर्वेद नव्या स्वरूपात - काळाची गरज : आयुर्वेदतज्ज्ञ अविनाश देवधर यांचे रत्नागिरीत व्याख्यान
प्रातिनिधिक छायाचित्ररत्नागिरी : आयुर्वेदतज्ज्ञ अविनाश देवधर (डोंबिवली) यांचे व्याख्यान एक डिसेंबर रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे. अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘आयुर्वेद नव्या स्वरूपात - काळाची गरज’ या विषयावर ते बोलणार आहेत. सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत जोशी पाळंद येथील मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हे व्याख्यान होणार आहे.

देवधर १९७७मध्ये बॅचलर इन फार्मसी झाले. त्यांना विविध मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या विभागात काम  करण्याचा, तसेच आयुर्वेदीय औषधांच्या मार्केटिंगचा अनुभव आहे. ते आयुर्वेदाचे अभ्यासक असून, मराठी विज्ञान परिषदेचे २००२पासून कार्यवाह आहेत. २००५ ते २००८ या काळात डोंबिवली विवेकानंद केंद्राचे काम त्यांनी केले असून, सध्या वनस्पती औषधी अभ्यास व मार्गदर्शन करत आहेत. 

देशात प्रचंड प्रमाणात औषधी वनस्पती असूनही आपल्याला सिंथेटिक औषधांची खरेच गरज आहे का, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, हर्बल औषधी यातील फरक व वेगळेपण या विषयांवर देवधर व्याख्यान देणार आहेत. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती, तिचा वापर कसा करून घ्यायचा, कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्याचे महत्त्व, आयुर्वेदाविषयी चुकीच्या कल्पना, तत्काळ गुण देणारी आयुर्वेदातील औषधे यांचा ऊहापोह ते करणार आहेत.

कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कोषाध्यक्ष राधिका वैद्य यांनी केले आहे.

ब्राह्मण ज्ञातिबांधवांसाठी ३० नोव्हेंबरला व्याख्यान
फक्त ब्राह्मण ज्ञातिबांधवांसाठी देवधर यांचे व्याख्यान ३० नोव्हेंबरला सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत होणार आहे. सद्यस्थितीतील नित्यकर्म, त्यामागील विज्ञान, ब्राह्मण समाजाची उद्दिष्टे, जबाबदारी व कर्तव्य या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. ब्राह्मणांकडे असलेली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, विवेकबुद्धी, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता, नैतिकता, समाजाला आदर वाटावा असे विविध गुण कसे व कोणामुळे मिळाले या संदर्भात ते बोलणार आहेत. या वेळी जास्तीत जास्त ब्रह्मवृंदाने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZPYCG
Similar Posts
रत्नागिरीत बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्राचे १७ नोव्हेंबरला उद्घाटन रत्नागिरी : सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र मोठ्या स्वरूपात काम करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन १७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीन वाजता मारुती मंदिर
एड्सविषयीच्या जनजागृतीत नर्सेसचे योगदान महत्त्वाचे रत्नागिरी : ‘एड्सबद्दलच्या जनजागृतीत आणि रुग्णांच्या समुपदेशनात नर्सेसचे योगदान महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील आशा सेविका, नर्सेस या आरोग्य यंत्रणेच्या खूप मोठ्या समन्वयक आहेत. त्यामुळे जनजागृतीची मोठी जबाबदारी नर्सिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांवर आहे. एड्सग्रस्तांना समाजाच्या पाठिंब्याचीही
ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार रत्नागिरी : ‘नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने २०१२ साली घेतला होता. तो बदलून आता नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल,’ असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित करण्यात
रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सव यंदा ‘योद्धा भारत’ या विषयावर रत्नागिरी : ‘योद्धा भारत’ म्हणजेच स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा आढावा हा या वर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवाचा विषय आहे. नवव्या वर्षात पदार्पण करतानाच दशकपूर्तीकडे वाटचाल करणारा कीर्तनसंध्या महोत्सव नव्या वर्षाच्या प्रारंभी, आठ ते १२ जानेवारी २०२० या काळात रंगणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language